अंबड -:
शासनस्तरावरून आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे,त्याचा पहिला बळी भटके विमुक्त जमाती ठरणार आहे,असा घणाघाती आरोप अॅड.अरूण आबा जाधव यांनी केला.ते अंबड जि.जालना येथे भटके विमुक्त आदिवासी चिंतन परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर राठोड,तर उद्घाटक साहित्यिक प्रल्हाद लुलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महंत आण्णा महाराज सुरूपे होते.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अॅड.जाधव पुढे म्हणाले की भटके विमुक्त जमातीचे आरक्षण रद्द होऊ द्यायचे नसेल तर भटक्यांच्या नेत्यांनी पक्षाचे,गटाचे, संघटनेचे जोडे बाजूला ठेवून आपण एकत्र येणे गरजेचे आहे.आपणास जर या धोक्याची जाणीव झाली नाही तर आपले अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.असेही त्यांनी सांगितले,पुढे ते म्हणाले की भटके विमुक्तांचे कित्येक आयोग, अभ्यास गट, कमिट्या झाल्या परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारला ती लागु करता आला नाही,हे सरकारचे अपयश आहे. आता आपल्यातील दुही टाळून आपणास एकी दाखवले तरच आपणास विकास साधता येईल,,, त्यासाठीच आम्ही राज्यव्यापी संवादयात्रा काढली आहे.याचा समारोप २३ सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर होणार आहे,आपण सर्व भटके विमुक्त बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रथम अरुण गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर हरिभाऊ गायकवाड,संजय मेढे, शिवाजी जोशी, समाधान गुहाळकर, विलास राठोड, प्रवीण घुगे,शिवराज शिंदे व देविदास हादवे यांनी मनोगत व्यक्त केले.तर या चिंतन परिषदेचे आयोजन डॉ.अभय जाधव, धर्मराज बाबर, मुकेश गोसावी यांनी केले होते.

Post a Comment
0 Comments