अंबड :- जिल्हा क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांच्यावतीने विविध शालेय स्पर्धा घेतल्या जात आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. *यामध्ये अंबड शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कु.अवधूत अंजली (१४ वर्ष वयोगटातील) 54 किलोखाली वजनगट कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर तिची निवड झालेली आहे.*
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र खरात सर उपाध्यक्ष संदिप दादा खरात, सचिव तारामती (माई) खरात, संचालिका शितल (ताई)खरात, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, बोंधलापुरी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पटेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन निचळ, वाल्मिक निंबाळकर, आसाराम भद्रे, भागवत खरात, विठ्ठल खरात, मुरली सहारे, विलास जाधव, प्रशिक खंडारे, प्राजक्ता धनवे, कमरुद्दीन शेख , लहू जाधव यांनी या यशाबद्दल विद्यार्थी नीचे अभिनंदन करण्यात आले.💐💐💐💐💐

Post a Comment
0 Comments