अंबड वार्ता
प्रतिनिधी आकाश जळके
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या 74 वा संस्था वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री केदारजी मंत्री (कार्यवाह स्था. व्य. स.), मा. श्री. आदिनाथजी ढाकणे (पोलीस उपनिरीक्षक अंबड), मा. श्री. विजयजी चाटूफळे ( केंद्रीय कार्य. सदस्य) मा. श्री व्यंकटेशजी गोसावी (स्था. व्य. स. अध्यक्ष) मा. श्री. रमेश सिंह बुंदेलखंडे, वैभव घुगे (माजी विद्यार्थी ), पार्थ सोमानी(माजी विद्यार्थी) विजय लांडे(माजी विद्यार्थी) सौरभ वराडे(माजी विद्यार्थी) अमित अंबिलवादे(माजी विद्यार्थी) मा.श्री. सुधाकरजी घायतडक (माध्य. विभाग मुख्याध्यापक) श्रीम. सुषमाताई मोरगावकर ( मुख्या .प्राथ. विद्यालय)उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम भारतमाता, व दत्ताजी भाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मा. श्री. विजय चाटूफळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत हे सांघिक स्वरूपात घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुषमाताई मोरगावकर यांनी केले.त्यामध्ये त्यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा इतिहास आणि कै. दत्ताजी भाले विद्यालय याचा इतिहास याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्यानंतर संस्था प्रार्थना हे प्रभो आनंददाता ही सांघिक प्रार्थना श्रीमती अनुराधा भाकरे मॅडम यांनी घेतली.त्यानंतर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माहितीपत्रक ध्येयपथ याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पहिली ते सातवीतील आदर्श विद्यार्थी, IMO परीक्षेमधील गोल्ड मेडल विद्यार्थी, मंथन परीक्षा आणि पावसाळी क्रीडा स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थी आणि इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. IMO परीक्षेमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद दिल्यामुळे शिक्षकांना आणि कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांना बेस्ट प्रिन्सिपल हा अवॉर्ड देण्यात आला. त्यानंतर स्व. द्वारकादासजी मंत्री काका यांचे स्वतःच्या वाचनालय पुस्तके ग्रंथालयास भेट म्हणून देण्यात आली.
मा. श्री विजयजी चाटूफळे सरांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा इतिहास आणि आज संस्थेचे असणारे भव्य रूप या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. मा. श्री आदिनाथ ढाकणे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास कसा करावा त्याचे मोलाचे मार्गदर्शन केले आणि संस्था वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात मा.श्री केदारजी मंत्री येणाऱ्या काळामध्ये भौतिक सुविधांसाठी आभाव कमी करून शाळा सुंदर कशी बनवणे याबद्दल प्रयत्नशील राहू असे सांगितलं. आणि संस्था वर्धापन दिनानिमित्त सर्वांना
शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. प्रतिभा आजबे व ऋणनिर्देश श्री. घायतडक सर यांनी केले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रम प्रसंगी सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment
0 Comments