Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड नगर परिषद च्या खुल्या जागेवरील आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा




 अंबड तालुका /प्रतिनिधी आकाश जळके


अंबड नगर परिषद च्या खुल्या जागेवरील छत्रपती योग वं क्रीडा प्रशिक्षण केंद्रावर आज 21 जून रोजी पहाटे 5:30 ते 7:15 पर्यंत योग शिबीर घेऊन नियमित योग साधकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला.   

नियमित योग साधनेचा धडा देणारे श्री घनश्याम शिंदे यांनी विवेचन करुन प्रत्यक्षिके द्वारे सुंदर योग सत्र घेतले. याप्रसंगी नप च्या पल्लवी देशपांडे, श्री सांगळे, अंबड शहरातील स्वामी समर्थ मंदिर येथे नियमित योग वर्गातील जेष्ठ योग साधक डॉ. कल्याण जोशी, ऍड. भागवत लहाने, श्री चिंताम्बर मेटकर, श्री भाऊसाहेब आंधळे, डॉ वाय बी कुलकर्णी, श्री राजेंद्र देशमुख, श्री प्रदीप लुखे, श्री नारायण तिकांडे, श्री सीताराम वाघ यांनी योग साधनेचा लाभ घेऊन सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री देवा चित्राल यांनी सूत्रसंचालन करुन आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments