पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने विशेष मोहिम राबवुन तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थ, ई सिगारेट अंमली पदार्थावर कारवाई करण्यात आली सिगारेट आणि ईतर तंबाखु उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादने, पुरवठा व वितरण याचे विनीमय) (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम प्रभावी २०१८ चे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अजय कुमार
बंसल यांनी दिनांक १०/०७/२०२५ व दिनांक ११/०७/२०२५ रोजी जालना जिल्हयातील घटकात शाळा व महाविदयालयच्या परिसरात तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थ, ई-सिगारेट व इतर अंमली पदार्थावर कार्यवाही करणे कामी आदेशित केल्याने जालना जिल्हा सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आष्टी अंतर्गत ९ पोलीस ठाणे टेंभुर्णी १५, पोलीस ठाणे परतुर ४, पोलीस ठाणे तालुका जालना १४, पोलीस ठाणे भोकरदन ०७, पोलीस ठाणे
चंदनझिरा १२, पोलीस ठाणे तिर्थपुरी ०६, पोलीस ठाणे मौजपुरी १०, पोलीस ठाणे कदिम जालना ०८, पोलीस ठाणे सदर बाजार ०९, पोलीस ठाणे हसनाबाद १८, पोलीस ठाणे सेवली ०३, पोलीस ठाणे मंठा १०, पोलीस ठाणे बदनापुर ०६, पोलीस ठाणे अंबड १२, पोलीस ठाणे जाफ्राबाद ०७, पोलीस ठाणे पारध ०८, पोलीस ठाणे घनसावंगी ०४ अश्या एकुण १६२ केसेस करण्यात आले असुन ३२,४०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments