Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त अंबड शहरात दिंडीचे आयोजन




प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड शहरात सामाजिक , शैक्षणिकव विविध उपक्रमात, तसेच विद्यार्थी घडवण्यात अग्रगण्य असणारे मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त अंबड शहरातून मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक शिवव्याख्याते, ह.भ.प. गणेशजी गिरी सर, गोकुळ राजपूत, निवृत्ती शिंदे, खरात सर, समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक गाढेकर सर , साठे कोचिंग क्लासेस चे संचालक महेशजी साठे सर,मघाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत वारकऱ्यांच्या वेशात,विद्यार्थी विद्यार्थिनी, टाळ,मृदुंग, विना, विठ्ठलाचा जयघोष करत, अभंग, गवळण सादर करत मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्र ते निळकंठेश्वर महादेव, मत्स्योदरी देवी, अशा मार्गाने दिंडी सोहळा काढण्यात येऊन दिंडीतील विद्यार्थ्यांनी उपस्थित लोकांची मनी जिंकून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक गोडी निर्माण होऊन संस्कृतीचे धडे दिले जात असून विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भावना निर्माण होते. आषाढी एकादशीचे महत्व, आषाढी एकादशी निमित्त सर्व संतमंडळी विठ्ठलाच्या नामात कशी रममान होतात याविषयी सविस्तर माहिती प्राध्यापक गणेशजी गिरी सर यांनी विद्यार्थ्यांना दिली.त्यांच्या या धार्मिक उपक्रमाचेअंबड शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments