अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. ज्योती दीपक सिंग ठाकूर यांची भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यकुशलतेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि संघटन कौशल्याचा गौरव या निवडीमुळे झाला असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दीर्घकाळ समाजकार्य, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पक्षनिष्ठा यामुळे ठाकूर यांना ही जबाबदारी मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात महिलांचे नेतृत्व बळकट करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.
या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त करत सौ. ठाकूर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्याकडून जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक जोमाने कार्यरत राहील, समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवली जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
“समाजकार्याची कळकळ आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभव यामुळेच सौ. ज्योती ठाकूर या पक्षाच्या विश्वासास पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे जालना जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक मजबूत होईल,” असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
ही निवड पक्षाच्या धोरणातील महिलांच्या सक्रिय सहभागाचा एक उत्तम आदर्श ठरत असून, सौ. ज्योती ठाकूर यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 🌷

Post a Comment
0 Comments