घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी) : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथुन जवळच असलेल्या भगवान नगर येथील वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पावसाळ्यातील चार महिने तारेवरची कसरत करावी लागत आहे पाऊस जर पडला तर या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना चालणेही अवघड होऊन बसत आहे. या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी भगवान नगर येथील पालकांनी केली आहे. या रस्त्यावरून दररोज २० ते २५ विद्यार्थ्यांना घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत येण्यासाठी रस्ता आहे. परंतु पावसाळ्यात विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून प्रवास करावा लागत आहे. चार वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्याची चिंता पडते पाऊस पडला तर कोल्ही नाल्यातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे संबंधित रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भगवान नगर येथील पालकासह विद्यार्थ्यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments