Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“मागेल त्याला सोलार” योजनेत प्रचंड भ्रष्टाचार!


गरीब शेतकरी लुटले गेले, अधिकाऱ्यांचे कोट्यवधींचे साम्राज्य


प्रतिनिधी : आकाश जळके

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलेली “मागेल त्याला सोलार” योजना आज प्रचंड भ्रष्टाचाराचे महाकेंद्र बनली आहे. महावितरणचे काही भ्रष्ट अधिकारी व लाईनमन यांनी या योजनेला लाचखोरीचे मोठे गाळे बनवले असून, गरीब शेतकऱ्यांचा थेट आर्थिक छळ केला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.


💰 “१०% दिल्याशिवाय बिल पास होणार नाही” – सर्रास व्यवहार

महावितरणच्या जालना विभाग क्र. २ मध्ये लाचखोरी इतकी उघड आहे की “१० टक्के दिल्याशिवाय बिल पास होणार नाही” असा डंका पिटला जात आहे.

ज्यांनी पैसे दिले त्यांचे अर्ज तातडीने मंजूर झाले.

ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांचे अर्ज महिनेन्‌महिने टांगून ठेवले गेले.


⚡ लाईनमनपासून अभियंता – भ्रष्टाचाराचा संपूर्ण साखळीकारभार

या विभागात भ्रष्टाचाराची सुरुवात थेट लाईनमनपासून होते आणि अधीक्षक अभियंत्यांपर्यंत पोहोचते.

एका लाईनमनने तर भ्रष्ट पैशातून दोन पेट्रोल पंप उभारल्याचे जनतेसमोर उघड झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.


गावोगावात चर्चा आहे की –

“लाईनमन आणि अधिकारी करोडपती झाले, पण सामान्य शेतकरी रोडपती झाला आहे!”


🚨 बोगस लाभार्थ्यांना सोलार, खरी पात्र मंडळी अजूनही प्रतीक्षेत!

तक्रारदार राजू रामनाथ उबाळे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नानुसार, खडकेश्वर येथे बोगस सोलार वाटपाची चौकशी झाली असूनही अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

खरे पात्र शेतकरी अजूनही सोलारसाठी रांगेत आहेत, तर बोगस लाभार्थ्यांना पैसे घेऊन थेट सोलार वाटप झाले आहे.


👉 विशेष म्हणजे, बोगस कागदपत्रे देऊन सोलार घेतल्याच्या प्रकरणी चौकशी पूर्ण होऊन आठ महिने झाले आहेत. तरीदेखील ग्रामीण विभाग क्रमांक २ चे सहाय्यक अभियंता नितीन चिंचाणे यांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.

ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.


🗣️ “वरच्या लोकांचे मी माणूस आहे” – गर्विष्ठ अधिकाऱ्यांचा अहंकार

अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुहास दत्तात्रय वरुडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत.

ते खुलेपणे म्हणतात –

“मुंबईच्या मोठ्या साहेबांसोबत मी नाश्ता केला आहे, मला काही वाकडं करणारं नाही!”

लाच न दिल्यास कॉन्ट्रॅक्टरना थेट दम देत – “तुमचं काम होणार नाही” अशी भाषा वापरली जाते.


📑 बोगस बिले, खोटी मंजुरी – जनता रडली, खिसे भरले

कॉन्ट्रॅक्टरकडून कामे करून घेताना थेट १०% कमिशन मागितले जाते.

ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांची बिले महिनोन्‌महिने अडकवली जातात.

तर दुसरीकडे, बोगस कामे दाखवून लाखो रुपयांची बिले पास करण्यात आली.

या प्रकारामुळे सरकारी निधी लुटला गेला आणि शेतकऱ्यांचा विश्वास तुडवला गेला.


⚖️ जनतेचा आक्रोश – “या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाका!”

ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की या घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुहास वरुडे यांची बदली करून जालना विभागातून हकालपट्टी करावी.


“लाईनमनपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची आर्थिक समृद्धी झाली, पण शेतकरी कर्जबाजारी होऊन उभा आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. दोषींना तुरुंगात टाका, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू!” असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


🔥 ही फक्त तक्रार नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची आक्रोशाची हाक आहे.

“मागेल त्याला सोलार” योजनेतील भ्रष्टाचार उघड झाल्याने आता सरकार आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी जनतेची जोरदार मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments