Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गोंदी पोलीसांची मोठी कारवाई; सहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 सुखापुरी (प्रतिनिधी): गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरीच्या वाहनांविरोधात मोठी कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली आणि एक मालवाहू तीनचाकी वाहन असा एकूण ₹6 लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 22 जुलै 2026 रोजी गोदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, गांधी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या मोटारसायकल प्रकरणातील वाहन एका उसाच्या शेताजवळ असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित a ऋतिक बाळू गव्हाणे (रा. दाडेगाव , ता. अंबड) यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता गोंदी पोलीस ठाण्यातील चोरीच्या मोटारसायकलीबाबत त्याने कबुली दिली. पुढील चौकशीत त्याच्या ताब्यातून आणखी चोरीच्या चार मोटारसायकली तसेच एक मालवाहू चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या सर्व वाहनांची एकूण किंमत ₹6,20,000 इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून इतर चोरीच्या वाहनांबाबतही चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेगवीर सिहं संधू , अपर पोलीस अधीक्षक, विक्रम साळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल शाकीरोद्दीन सिद्धीकि , दीपक भोजगे, गजानन भवरे प्रदीप हिवाळे, सलमान सय्यद तसेच इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता


.

Post a Comment

0 Comments