हमीभावासाठी अंबड बाजार समितीला ठोकले कुलूप..!
कापसाला दहा, तर सोयाबीनला साडेआठ हजार भाव देण्याची छावा संघटना शेतकरी आघाडीची मागणी
रोहीलागड/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ८ हजार ५०० रुपये व कापसाला १० हजार रुपये हमी भाव दयावा तसेच शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करावी यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वियजकुमार घाडगे पाटील यांच्या १८ सप्टेंबरपासून औसा या ठिकाणी उपोषण सुरू केलेले आहे. सदर उपोषणाची शासनाने गंभीरतेने आद्यपही दखल घेतलेली नाही. सदर सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ जालना जिल्हा छावाच्यावतीने अंबड तहसीलदारांना काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. त्यात लवकर दखल घेतली गेली नाही तर छावाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यात देण्यात आला होता. सोमवारी (दि.३०) रोजी छावाच्यावतीने पहिले तीव्र आंदोलन म्हणून अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना निवेदन कामबंद ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या १२ दिवसांपासून औसा या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत. दरम्यान पकृती खालावल्यामुळे त्यांच्या
जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
त्यामुळे येत्या २ दिवसात शासनाने याबाबत काहीच ठोस निर्णय न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्ह्यासह मराठवाडयातील तहसील कार्यालय व कृषी कार्यालय ताब्यात घेऊ याची नोंद घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा छावाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. या निवेदनावर छावाचे
मराठवाडा अध्यक्ष देवकर्ण पाटील वाघ, मराठवाडा कार्याध्यक्ष विलास कोल्हे, जिल्हाध्यक्ष राध्येश्याम पवळ, जिल्हाध्यक्ष संदीप लांडगे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवनाथ काळवणे, तालुकाध्यक्ष उमेश गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष बळीराम सपकाळ, सोपान उडदंगे, बंटी गायकवाड, गणेश लोहकरे, रमेश टकले, कैलास गिरे, दिपक घुले, विनोद दिवटे, लहु गायकवाड आदींची नावे आहेत.

Post a Comment
0 Comments