अंबड प्रतिनिधी /आकाश जळके
दिनांक 26/06/2025 रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारला असता शकिल बासेद कुरेशी वय 60 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला जुना जालना याने त्याचे वाडयामध्ये 16 गोवंशीय जातीचे लाल, तांबडया, काळया, पांढऱ्या रंगाचे बैल व गोऱ्हा असे एकुण किंमती 2,40,000/- रु. किंमतीचे डांबुन ठेवल्याचे मिळुन आल्याने सदरची गोवंशीय जनावरे हे ताब्यात घेऊन ते गोरक्षण पांजरापोळ देऊळगावराजा रोड जालना या गोशाळेत ठेवण्यात आलेले आहे व इसम नामे शकिल बासेद कुरेशी वय 60 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला जुना जालना याचेविरुध्द पोलीस स्टेशन कदिम जालना येथे प्राणी संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक श्री. माने, पोलीस उप निरीक्षक श्री. मोरे पोलीस स्टेशन कदिम जालना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री. योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, जगदिश बावने, दिपक घुगे, गोपाल गोशीक, कैलास खार्डे, विजय डिक्कर, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, संदिप चिंचोले, इर्शाद पटेल, किशोर पुंगळे, योगेश सहाने सर्व स्थागुशा जालना व पोलीस स्टेशन कदिम जालना येथील अंमलदार राठोड, भाले, बाबा गायकवाड, किरन चेके, शेख, अन्सारी, व गायकवाड सर्व नेमणुक पोलीस स्टेशन कदिम जालना यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments