अंबड प्रतिनिधी : वाहतूक सुरक्षा जागरूकता ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील एक महत्त्वाची बाब आहे. जी दुर्लक्षित करता कामा नये, असे प्रतिपादन पी.एस.आय. आर. के. निकम यांनी केले.
चौधरी नगर येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज मध्ये वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रमात गुरूवारी (दि.२६) रोजी पार पडला. यावेळी पी.एस.आय. निकम बोलत होते. यासपीठावर प्रमुख
वाहतुकीचे नियम पाळा
नेहमी क्रॉसवॉक किंवा झेब्रा क्रॉसिंग वापरणे, वाहतूक सिग्नलचे पालन करावे, हेल्मेट आणि सीटबेल्ट घाला, चालताना किंवा सायकल चालवताना लक्ष विचलित करणे टाळावा, असे आवाहन पीएसआय निकम यांनी केले.
पाहुणे म्हणून भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रेवती मांटे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. सुगदेव मांटे, प्राचार्या लतिका मनोज, महामार्ग पोलिस विभागाचे एएसआय शिवाजी साळुंके, हेड कॉन्स्टेबल एन. पी.मिसाळ, वरुण अंबेकर उपस्थित होते. निकम म्हणाले की, रस्ता वाहतूक नियमांचे महत्त्व समजून घेऊन आणि सुरक्षित सवयी लावून, विद्यार्थी रस्त्यावर स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकतात.

Post a Comment
0 Comments