अंबड तालुका/ प्रतिनिधी आकाश जळके
समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 374 मुंबई कॉरिडोर मोजे खादगाव तालुका जिल्हा जालना शिवार येथे अमिर खाॅन भुल्ला खाॅन व्यवसाय ड्रायव्हर राहणार ग्राम अकबरपुर तहसील अलवर जिल्हा अलवर राज्य राजस्थान हे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाने ट्रक क्रमांक आर जे 47 जीए 33 34 मध्ये लोखंडी प्लेट घेऊन जात असतांना त्यांची ट्रक वरील चैनल नंबर 374 येथे गिअर बॉक्स चे बोल्ट खराब झाल्याने उभी असतांना रात्री दिनांक 21/06/2025 रोजी अंदाजे 03.07 मिनिटाने रात्री त्यांच्या ट्रक जवळ पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 47 A 89 78
येऊन उभी राहिली त्यातून चार इसम खाली उतरून सदर ट्रकचे डिझेल टाकीचे झाकण तोडून त्यामध्ये नळी टाकून इलेक्ट्रिक मोटरने डिझेल चोरी करत असतांना ट्रक चालकाने त्यांना विरोध केला असता त्यास त्यांनी चाकूचा धाक दाखवून चापटबुक्याने मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेले 500 रुपये दराच्या चार नोटा असे 2000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले सदर ठिकाणी रात्र गस्तीवर असलेली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एन टी नरोटे सोबत HC/1309 बि-हाडे अमलदार कदम ,निकाळजे यांना सदर ट्रक मधून डिझेल काढताना दिसल्याने त्यांनी सदर गाडी ट्रक जवळ थांबवली असता पोलिसाला पाहतास त्यावेळी शिफ्ट मध्ये आलेले तीन इसम गाडीमध्ये बसून समोर मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात पळून गेले व एक इसम हा बाजूच्या शेतात पळून जात असतांना त्यास आम्ही पाठलाग करून पकडले व त्यास पकडून गाडी जवळ आणले असता त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्य केशव पंडित राहणार भवानीनगर जालना असे सांगितले त्याला त्याच्यासोबत चोरी करण्याकरता आलेल्या साथीदाराचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांची नावे 1) राहुल राधाकिसन कोकाटे राहणार रांजणगाव तालुका बदनापूर हल्ली मुक्काम गोकुळधाम सोसायटी जालना 2)ओम बाळू उर्फ बाळासाहेब खरात राहणार भवानी नगर जालना 3)निलेश भारुडकर राहणार चिखली जिल्हा बुलढाणा असे सांगितले त्यानंतर सदर ट्रकच्या डिझेल टाकीची पाहणी केली असता खालील प्रमाणे डिझेल चोरी करून गेल्याचे दिसून आले ते पुढील प्रमाणे 170 लिटर डिझेल अंदाजे 15640 रुपयांचे किमतीचे अंदाजे व फिर्यादीच्या खिशातील जबरदस्तीने चोरून नेलेले नगदी 2000 असे एकूण 17640 रुपयाचा माल जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून तसेच धमक्या व मुक्का मार देऊन घेऊन गेले आहे. वरील फिर्यादीच्या तक्रारीवरून वरून पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पकडलेला आरोपी त्यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशन चंदंजिरा करीत आहे.
वरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर मॅडम मा.पोलीस उपअधीक्षक डिसले, मा. पोलीस निरीक्षक किशोर चौधरी महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एन टी नरोटे,Asi/ राजे सोळंके, HC/1309 बि-हाडे, HC/342 शेख, HC/1413, गायकवाड, HC/194 मिसाळ पोलीस अमलदार कदम, निकाळजे ,अजहर शेख,ठोंबरे, परसु वाले महामार्ग पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे लहू जाधव ,सुशील घागरे, मनोज राठोड ,रवी पवार यांनी वरील कारवाई केली आहे.

Post a Comment
0 Comments