Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वीरसागर महाराज यांच्या हस्ते संयम कीर्ती स्तंभाचा लोकार्पण सोहळा




अंबड तालुका (प्रतिनिधी)

आकाश जळके 

आचार्य विद्यासागर महाराज यांचे शिष्य निर्यापक श्रमण विरसागर महाराज यांचा सानिध्यात २६/२७/२८ जुन रोजी १००८ भगवान महावीर दि. जैन मंदिर अंबड येथे नूतन निर्मित वेदीची बेदी प्रतिष्ठा आयोजित करण्यात आली असून ३० जून रोजी १००८ भगवान महावीर चौकाचा (संयम कीर्ती स्तंभाचा) लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची पत्रिका


सुपूर्द करत आमंत्रण पत्रिका मान्यवरांना देण्याआले. आमंत्रण पत्रिका देण्याचा कार्यक्रम


जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ


उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, जीएसटी ऑफिसर चेतन जैन अन्य मान्यवराचा उपस्थित संपन्न झाला. या वेळेस समाजातील अनिल छाबडा सुरेन्द्र बुरले, रविंद्र मसलकर अरूण करतगवंडे, अतिश बीडकर अलकेश आव्हाने प्रेमचंद खले सचिन शेलार सचिन खले संजय उपाध्ये सतिश भेडुळकर अतुल तुनतुने आदींची उपस्थिती होती

[6/21, 11:57 PM] Akash Jalke: *अनुदान घोटाळा; अर्ध्यात तुम्ही,अर्ध्यात आम्ही ही भूमिका कर्मचाऱ्यांच्या अंगलट येणार*


अंबड तालुका /प्रतिनिधी आकाश जळके 


*सरकारी अनुदान घोटाळ्यात अर्ध्यात तुम्ही अन् अर्ध्यात आम्ही ही भूमिका काही तलाठी, ग्राम पंचायत अधिकारी,कृषी सहाय्यकांच्या अंगलट येण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे.पूर्वी रोजगार हमी योजनेच्या कामात हा फॉर्मुला वापरून अनेक सरकारी अभियंते आणि संबधित कर्मचाऱ्यांनी सरकारी अनुदानावर डल्ला मारत आपले आर्थिक हित साधल्याची प्रकरण समोर असतांनाच पीक नुकसान भरपाईच्या अनुदान वाटपात देखील हाच फॉर्मुला वापरून काही तलाठी,ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यकांनी संगनमत करून सरकारी अनुदान घोटाळ्यात हात धुवून घेतले असल्याचे बोलले जात आहे.अनेक शेतकऱ्यांची बागायती शेती नसतांना बागायत शेती दाखवणे,पीक पेरणी केली नसतांना चिरी मिरी घेऊन पंचनाम्यात विविध पीक पेरणी दाखवण्याचा प्रताप कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांनी सातत्याने केला आहे.मात्र, याकडे महसूल व कृषी खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मुद्दाम दुर्लक्ष करत अशा प्रकारच्या घोटाळ्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्यानेच भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असल्याची चर्चा आहे.*

Post a Comment

0 Comments