Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथे काल लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

         


अंबड प्रतिनिधी आकाश जळके 

संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथे काल लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.26 जून हा दिवस "सामाजिक न्याय दिन " म्हणून साजरा केला जातो.

        याप्रसंगी व्यासपीठावर मा.प्राचार्य आर.के.परदेशी सर, प्रा. डॉ.गजानन अवचार सर, व कार्यालयीन प्रमुख श्री जी.डी.चोथे होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनानावर उपप्राचार्य प्रा.डॉ.गजानन अवचार सर यांनी प्रकाश टाकला.

         शाहू महाराजांचे जीवन हे खऱ्या अर्थाने शोषित -वंचित समूहासाठी होते.त्यांनी सर्वप्रथम आपल्या संस्थानात 50% आरक्षण लागू केले.सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या जीवनात अंगीकारली.असे प्रतिपादन त्यांनी केले.

       कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य राजेंद परदेशी सर यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ सुनील सामग सर यांनी केले.

यावेळी बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्तिथ होते.

Post a Comment

0 Comments