अंबड/प्रतिनिधी
: शहरातील ओमशांतीनगरलगत असलेल्या शमीम कॉलनी, फैसलाबाद कॉलनीमध्ये चोरट्याने धुमाकूळ घालत चार घर फोडले. यात सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. ही घटना गुरुवारी (ता. २६) पहाटे घडली.
शमीम कॉलनी चोरट्यांनी तीन घर फोडले. यात मोसंबीचे व्यापारी नशीर बागवान यांचे घर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले साडेतेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व २३ तोळे चांदीचे दागिने व रोख चार लाख वीस हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. याच भागात अनिता सुरेश जाधव यांच्या घरातील दोन तोळे सोने,चार ग्रॅमची सोन्याची नथ, सहा ग्रॅमची नथ, सोन्याचा एक ग्रॅमचा दागिना, पायातील चार तोळ्यांचे चांदीचे चैन, चांदीचे जोडव्याचे दोन नग चोरून नेले. तर शनो शकील कुरेशी यांचे दीड ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर, पंधरा ग्रॅमचे सेव्हनपिस, पंधरा ग्रॅमची सोन्याची नथ व घरातील रोख चाळीस हजार रुपये चोरीला गेले आहेत. फैसलाबाद येथील इम्रान गफार शेख यांच्या घरातील रोख सात हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकासही बोलाविण्यात आले होते.



Post a Comment
0 Comments