Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अटटल घरफोडी करणारे सराईत 02 अंबड पोलिसांच्या ताब्यात

 



अंबड प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड पोस्टेच्या डी बी पथकांने आरोपीचा कसुन शोध घेतला असता नमुद गुन्हा हा सराईत आरोपी 01. शेख अशपाक शेख आसिफ वय 45 वर्षे राहणार मोहमदीया कॉलनी बार्शी नाका बिड याने केला असल्याचे गोपनिय बातमीदारकडून समजले, त्यावरुन डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोहेका 1169 यशवंत मुंढे, पोहेका 1272 दिपक पाटील, पोशिक्रं 175/ बालसराफ असे नमुद आरोपीच्या शोधाकरीता रवाना होवून आरोपीचा गोपनिय बातमीदार व तांत्रिक मदतीने शोध घेतला असता शेख अशपाक हा पेठ बिड पोलीस ठाण्याच्या हददीत लपून बसलेला असल्याचे समजले, पेठ बिड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अमलदार यांच्या मदतीने आरोपीला दिनांक 28/06/2025 रोजी रात्री ताब्यात घेवुन चौकशी करुन पोलीस खाक्या दाखविल्यावर त्याने नमुद गुन्हा साथीदार 02. शेख कलीम शेख अलीम वय 32 वर्षे राहणार दहीफळ ता जि बिड यांच्यासोबत केला असल्याचे सांगितले. त्यावरुन शेख कलीम याला दिनांक 01/07/2025 रोजी शिक्रापुर पुणे येथुन ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीकडून गुन्हयातील 01. तीन तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार, 02. तीन तोळे वजनाचे गोट, 03. दिड तोळा वजनाचे कानातील झुंबर, 04. तीन सोन्याच्या अंगठया, 05. पायातील चांदीचे पैंजन, 06. चांदीच्या अंगठया 03 नग असा एकुण 8,20,000/ रुपये किंमतीचा मुददेमाल चोरी केल्याची कबुली देवुन जप्त करण्यात आलेला आहे. तसेच अटक आरोपीकडून अधिक तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments