अंबड /प्रतिनिधी आकाश जळके
बदनापूर- अंबड विधानसभा मतदारसंघातील अंबड तालुक्यातील झिरपी येथील आई-वडिलांना एकुलता एक असलेला १७ वर्षीय वारकरी नवयुवक आकाश उर्फ गोविंद कल्याण फुके याचे आळंदी ते पंढरपूर पायी चालत असताना मंगळवार दिनांक एक जुलै 2025 रोजी नीरा नदी काठावर पाय धुत असताना नवयुवक वारकरी पाय घसरून सकाळी सहा वाजता नदीमध्ये पडला, या वारकऱ्याचा अजून कुठलाही शोध लागला नाही यासाठी आमदार नारायण कुचे यांनी पुणे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी फोन करून संवाद साधला परंतु अद्यापही या वारकऱ्यांचा शोध लागला नसल्याने आमदार नारायण कुचे यांनी विधिमंडळ अधिवेशनात विधिमंडळ मार्फत सरकारला प्रश्न करून तात्काळ या वारकरी नवयुवकाच्या मृतदेहाचा शोध घ्यावा असा प्रश्न आमदार नारायण कुचे यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडला आणि तात्काळ शोध यंत्रणेत वाढ करून नवयुवक वारकरी आकाश उर्फ गोविंद कल्याण फुके यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला, याच बरोबर नवयुग वारकऱ्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी असा प्रश्न यावेळी विधिमंडळ अधिवेशनात आमदार श्री नारायण कुचे यांनी उपस्थित केला.

Post a Comment
0 Comments