Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड तालुक्यातील १११ पैकी तब्बल ५६ ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज

 


अंबड / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील १११ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसिलदार विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सोमवारी (ता. १४) तहसिल कार्यालयात काढण्यात आली. तालुक्यातील एकूण १११ पैकी तब्बल ५६ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे.

तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित या आरक्षण सोडतप्रसंगी नायब तहसिलदार महेंद्र गिरगे, एकनाथ भोजने, विश्वास धर्माधिकारी यांच्यासह भागवत देशमुख, व्ही. डी. घुले यांची उपस्थिती होती.

या सोडतीत अनुसुचित जमाती महिलासाठी मार्डी व वडीगोद्री तर अनुसुचित जमाती (सर्वसाधारण)

साठी डोमलगाव या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले. अनुसुचित जाती (महिला) साठी भिवंडी बोडखा, वलखेडा, किनगाववाडी, पारनेर, साडेगाव, लोणार भायगाव व जामखेड या ७ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले तर अनुसुचित जाती (सर्वसाधारण) साठी सारंगपूर, नारायणगाव (कासारवाडी), दहिपुरी, धाकलगाव, ढालसखेडा, भांबेरी व धनगर पिंपरी या ७ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी (चिठ्ठीव्दारे) डोमेगाव, आपेगाव, झोडेगाव-कानडगाव, करंजळा-जालुरा-रेवलगाव, साडेसावंगी, दौदडगाव-सौंदलगाव, झिरपी, नागझरी, शेवगा, पिंपरखेड, ताडहादगाव, हसनापुर, शिराढोण-वाडी, शिराढोण,काटखेडा व निहालसिंगवाडी या १५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले.

नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी टाका, किनगाव, भनंग जळगाव, दुनगाव, आलमगाव, रुई, कर्जत, पानेगाव, पाथरवाला खुर्द, गंगाचिंचोली-इंदलगाव, पराडा, अंतरवाली सराटी, धनगर पिंपळगाव, चांभारवाडी व हरतखेडा या १५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले. सर्वसाधारण (महिला) साठी हस्तपोखरी, एकलहेरा, लालवाडी, बोरी, गोंदी, वडी काळया, बदापूर अंतरवाला-आवा, महाकाळा-भगवाननगर-गहिनीनाथनगर, पिठोरी सिरसगाव, कवडगाव, कोठाळा खुर्द, बळेगाव, ईश्वरनगर वसंतनगर-कैलासनगर, रामनगर, कोळी सिरसगाव, वाघलखेडा, रोहिलागड, बनगाव-दहिगव्हाण-बेलगाव, साष्ट पिंपळगाव, डावरगाव, मसई, जोगेश्वरवाडी-विठ्ठलवाडी, पागीरवाडी-नागोण्याची वाडी, गोंविंदपुर, राह्वाडी-गंगारामवाडी, पावसे पांगरी, चिंचखेड, लखमापुरी, सुखापुरी, खेडगाव, माळ्याचीवाडी-भोकरवाडी या ३२ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी चंदनापुरी बु. रेणापुरी, गोरी-गंधारी, रामगव्हाण बु., खडकेश्वर-भाटखेडा, दुधपुरी, पाथरवाला बु., कुरण, लासुरा-वडीलासुरा, दहयाळा, माहेर भायगाव, घुंगर्डे हादगाव, नांदी, वाळकेश्वर, कौचलवाडी, चुर्मापुरी, भालगाव, कुक्कडगाव, नालेवाडी, शिरनेर, दाढेगाव-मठतांडा, बनटाकळी, शहापुर, चंदनापुरी खुर्द, देशगव्हाण, चिकनगाव, बक्ष्याचीवाडी-लेंभेवाडी, मठ पिंपळगाव, सोनक पिंपळगाव, पांगरखेडा, मठ जळगाव, शहागड, बठाण खुर्द व बारसवाडा या ३२ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले. एकंदरीत अनुसुचित जमाती महिलांसाठी २, अनुसुचित जाती महिलांसाठी ७, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १५ आणि सर्वसाधारण महिलांसाठी ३२ अशा एकूण ५६ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे १११ पैकी तब्बल ५६ ग्रामपंचायतीत महिलाराज येणार आहे. 

Post a Comment

0 Comments