Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड घनसांवगी रोड वरती भीषण अपघात





 आज दिनांक 15 /7 /2025 रोजी अंबड घनसावंगी रोड वरती वलखेडा पाटीजवळ फोर व्हीलर व दुचाकीचा अपघात झाला आहे या अपघातात फोर व्हीलर ही क्रियेटा व दुचाकी ही पल्सर होती हा अपघात समोरासमोर झाला असून यात दोन सख्या भावांना गंभीर दुखापत झाली आहे .सदरील घटना ही आज सकाळी 9 वाजून 30मिच्या वाजेच्या सुमारास घडली आहे .यात चार चाकी क्रमांक mh 34 br 7011 व दुचाकी क्रमांक mh 23am4329 अपघातात जखमींची नावे बाळू अशोक बर्डे वय 38 व दीपक अशोक बर्डे वय 25 दोघे राहणार खडकेश्वर तालुका अंबड असे आहे. घटनास्थळावरून नागरिकांनी अपघाताची माहिती 108 ला दिली असता ॲम्बुलन्स द्वारे जखमींना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर डमाळे व डॉक्टर श्रीकांत यांनी जखमी वरती उपचार केला आहे. या अपघातात बाळू यांना मांडीलाइजर झाली आहे तर दीपक बर्डे यांना उजव्या पायाला फॅक्चर झाले आहे .अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात  जखमीवरती उपचार चालू आहे.

Post a Comment

0 Comments