अंबड पाचोड रोड वरील इच्छापूर्ती श्री साईबाबा मंदिर, पाचोड रोड वरील घटना ...
अंबड : येथील दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी रविंद्र बापूराव कारके यांची मारुती सुझुकी कंपनीची सिल्वर कलरची अल्टो एल एक्स आय जिचा क्र. एम एच १२ डी एम ८७०६ ही दि.१५ जुलै च्या रात्र ९: ००वाजता त्यांनी घरामसोर लावली होती दिनांक १६ जुलैच्या भल्या पहाटे ३:३१ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी इच्छापूर्ती साईबाबा मंदिर पाचोड रोड अंबड येथून पळवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र बापूराव कारके हे दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी असून त्यांच्या मालकी हक्काची
अल्टो एल एक्स आय एम एच १२ डी एम ८७०६ ही कार जिची अंदाजे किंमत रुपये १५०,००० (एक लाख पन्नास हजार रुपये) अशी असून त्यांनी दररोज प्रमाणे इच्छापूर्ती श्री साईबाबा मंदिर पाचोड रोड अंबड येथील घरासमोर काल दि. १५ जुलै रोजी संध्याकाळी ९.०० वाजेच्या सुमारास उभी केली व जेवन वगैरे करून झोपी गेले. त्यानंतर दि १७ जुलै रोजी सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मिना रविंद्र कारके ही झाडू मारण्यासाठी घराच्या बाहेर आल्या असता त्यांना सदर अल्टो कार दिसून न आल्याने
सदर कारचा आजुबाजुला व इतरत्र शोध घेऊन त्यांनी पती रविंद्र कारके व मुलगा मंगेश कारके आपली गाडी घरा समोर दिसत नसून तुम्ही कोण्या मित्राला दिली आहे का असे विचारले असता रवींद्र कारके यांनी नाही म्हटले व सदर गाडीच्या शोध कामी मित्रमंडळाला नातेवाईकांना घटने संदर्भात अवगत करून शोधूनही गाडी मिळत नसल्याने रविद्र कारके यांच्या फिर्यादीवरून आज दि. १७ जुलै रोजी अंबड पोलिसातअज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... घटनेचा तपास अंबड ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप कुटे यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला असल्याची माहिती अंबड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांनी दिली आहे...तर काही कर्मचारी हे कार व अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत....

Post a Comment
0 Comments