Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

 




आज दिनांक 15/07/2025 रोजी तक्रारदार यांचेकडून मत्स्योदरी देवी मंदिराचे सभामंडपाचे शेजारी पंचासमक्ष लाचेची रक्कम 4,000/- रुपये आलोसे श्रीपाद देशपांडे ग्राम महसूल अधिकारी यांनी स्वीकारले असता आलोसे देशपांडे यास सापळा पथकाने ताब्यात घेऊन लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त केली.

तक्रारदार यांनी अंबड शहरात एक रिकामा प्लॉट खरेदी केला आहे.त्या प्लॉटचा फेर तक्रारदार यांचे नावे घेण्यासाठी आलोसे ग्राम महसूल अधिकारी देशपांडे यांनी 6,000/- रुपये लाचेची मागणी केली.परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाच लुचपत पथक जालना युनिट यांचे कडे दिनांक 15/07/2025 रोजी तक्रार केली .

:- दिनांक 15/07/ 2025 रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची तक्रारदार यांना पंच यांच्या सोबत आलोसे श्रीपाद देशपांडे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे पाठवून पडताळणी केली असता, आलोसे श्रीपाद देशपांडे ग्राम महसूल अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे 6,000/- रुपये, लाच मागणी करून तडजोडी अंती 4,000/ – रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.


सापळा कारवाई :– आज दिनांक 15/07/2025 रोजी तक्रारदार यांचेकडून मत्स्योदरी देवी मंदिराचे सभामंडपाचे शेजारी पंचासमक्ष लाचेची रक्कम 4,000/- रुपये आलोसे श्रीपाद देशपांडे ग्राम महसूल अधिकारी यांनी स्वीकारले असता आलोसे देशपांडे यास सापळा पथकाने ताब्यात घेऊन लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त केली.


ठिकाण :- मत्स्योदरी देवी मंदिराचे सभामंडपाचे शेजारी अंबड जि.जालना आलोसे यांच्या अंग झडतीत एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल , व 460/-रुपये व लाचेची 4000/- रु रोख रक्क्म मिळुन आली.

आलोसे यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील निरीक्षण, विश्लेषण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

आरोपी यांची घरझडती प्रक्रिया सुरु आहे

पोलीस ठाणे अंबड जि.जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सापळा पथक – पोहेकॉ/श्रीनिवास गुडूर , गणेश चेके, शिवलिंग खुळे ला. प्र. वि. जालना चालक पोहेकॉ/ बिनोरकर

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी ईसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास

*टोल फ्री क्र:- 1064

Post a Comment

0 Comments