Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसांसह केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा जालनाची कारवाई

 


 प्रतिनिधी आकाश जळके 

दिनांक 01/07/2025 रोजी जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टल बाळगणारा इसम नामे महेश विष्णु निचळ रा. शिंदे वडगाव ता.घनसावंगी जि. जालना हा पानेवाडी ते राजेगाव रोडने कमरेला पिस्टल लाऊन तो फिरत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी पानेवाडी ते राजेगाव रोडवर पानेवाडी शिवारात रस्त्याने संशयास्पद एक इसम मिळुन आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश विष्णु निचळ वय 26 वर्षे रा. शिंदे वडगाव ता. घनसावंगी जि. जालना असे असल्याचे सांगीतले गोपनिय खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहीतीमधील इसम हाच असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात व कब्जात त्याचे कमरेला खोवलेली एक गावठी पिस्टल व 06 जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे घनसावंगी येथे कलम 3/25 आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व श्री.विशाल खांबे उप विभागीय पोलीस अधिकारी साहेब उप विभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, देविदास भोजने, इर्शाद पटेल, सागर बाविस्कर, संदिप चिंचोले, दत्ता वाघुंडे, सोपान क्षिरसागर, धीरज भोसले, योगेश सहाने, चालक अशोक जाधवर सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments