अंबड/प्रतिनिधी आकाश जळके
अंबड, जालना तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीचे पात्र हे जिल्ह्यातील वाळूमाफियांचे केंद्र बनले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार प्रत्येक तालुक्यात वाळू चोरी रोखण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. परंतु, हे पथक केवळ नावापुरते राहिले असून, रात्री अकरा ते पहाटेच्या पाच दरम्यान दुधना नदीतील वाळू घाट साफ होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या लाखो रूपयाच्या महसूलला चूना लागत आहे. दुधना काठच्या गावकऱ्यांनी वेळोवेळी दुधनेचे पात्र वाचविण्यासाठी आवाज उठवलेला आहे. परंतु, तात्पुरत्या कारवाई व्यतिरिक्त पोलीस आणि महसूल यंत्रणा ठोस उपाययोजना करत नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांची साथ वाळूतकस्करांना मिळत असल्याने वाळू उपसा बंद होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. रात्रंदिवस होणारा वाळू उपशामुळे दुधना काठची गावे आणि शेतकऱ्यांना पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सध्या नदीत काही ठिकाणी थोडेफार पाणी आहे. त्यात अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव जालना तालुक्यातील गोलापांगरी, दुधना काळेगाव व अंबड पोलिस हद्दीतील व घनसावंगी तहसील अंतर्गत येणाऱ्या दैठणा येथुन वाळुमाफीया रोज रात्री आकरा ते पाच ते हायवा द्वारे वाळू उपसा करत आहेत. हा उपसा महसूल व पोलिस प्रशासनाच्या संगपमतानी सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चोरलेली वाळू वाहून नेताना एकाही वाहनावर कारवाई होत नाही. या काळात महसूल प्रशासनाने वाळू घाट अबाधीत ठेवणे गरजेचे असताना त्यांचे दुर्लक्ष होते. याचा फटका लिलाव करताना महसूल प्रशासना बसला तरी त्यांच्या लक्षात का येत नाही.स्थानिक पातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी यांचे वाऴू उपसा करणाऱ्यांशी हितसंबध असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरवर्षी हा प्रकार होत असून, वरिष्ठ अधिकारी देखील याकडे लक्ष देत नाही.

Post a Comment
0 Comments