Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"तहसील कार्यालयाची पारदर्शक कारवाई; अर्ज तपासणीने गाठला वेग!"

अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके



अंबड प्रतिनिधी | ३० जुलै २०२५

अंबड तहसील कार्यालयामार्फत सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्राप्त झालेल्या ‘अभिवृद्धी पुनर्वैधता (Revalidation)’ अर्जांची तपासणी प्रक्रिया वेगात राबवली जात असून, आतापर्यंत एकूण ५२२ अर्जांची सखोल पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये ४११ अर्ज मंजूर, ३६ अर्ज वगळले गेले असून, ७५ अर्ज सध्या पुनर्तपासणीसाठी प्रलंबित आहेत.

तपासणी मोहिमेत मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहाय्यक यांनी थेट अर्जदारांच्या शेतावर जाऊन माहिती पडताळली. संपूर्ण कारवाईवर तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार आणि सहा कर्मचारी यांचे थेट नियंत्रण होते.

तपासणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, उर्वरित अर्जांचीही लवकरच निकडीनं छाननी करण्यात येईल, असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले.

तालुकास्तरीय प्रशासनाच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे लाभार्थ्यांना योग्य वेळी लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, हे विशेष!







Post a Comment

0 Comments