Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सखूबाई नवनाथ डावखर यांचे दुःखद निधन – कुटुंबावर शोककळा


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

भिवंडी बोडखा, ता. अंबड (दि. 29 जुलै 2025) – भिवंडी बोडखा येथील सखूबाई नवनाथ डावखर (वय 55) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी 8:30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे डावखर कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली आहे.

सखूबाई डावखर या सौम्य स्वभावाच्या, कष्टकरी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. कुटुंबासाठी झिजणारे त्यांचे आयुष्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या शांत, समंजस स्वभावामुळे त्या सर्वांच्या लाडक्या होत्या.

त्यांच्या पश्चात पती नवनाथ डावखर, मुलगी जयश्री व जावई, दोन मुले – राहूल डावखर आणि तात्यासाहेब डावखर, दोन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. परिवारावर अचानक आलेल्या या दुःखद प्रसंगामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सखूबाई यांच्यावर आज सकाळी ११ वाजता बोडखा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवाराला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.

Post a Comment

0 Comments