अंबड प्रतिनिधी/ आकाश जळके
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गुरु आणि शिष्य यांचा अतूट नातेसंबंध असणारा गुरुपौर्णिमा उत्सव योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील शिस्तप्रिय, गुणवान, कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय, मुख्याध्यापक, महावीर शेलार, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक नरेंद्र रत्नपारखे, प्रदीप जाधव, चक्रपाणी मुळे,भीमराव ढाकणे, सारिका इंगळे,अश्विनी चौधरी, शितल वानखेडे,सारिका मस्के, अंगणवाडी सेविका कावेरी मुळे, राधा चौरे, आशाताई मीना साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्त पोखरी येथील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रमशील, तंत्रस्नेही,विद्यार्थीप्रिय शिक्षक, दत्तात्रय शिंदे, समर्थ राजयोग दैनिक जिल्हा प्रतिनिधी फारुक शेख, दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके, भारतीय लोकशाही न्यूज संपादक आकाश जळके, महाराष्ट्र ग्रामीण न्युज तालुका प्रतिनिधी गणेश सपकाळ, लोकनायक तालुका प्रतिनिधी सुरेश खरात,शा.व्य.समिती अध्यक्ष कारभारी मस्के, सरपंच दत्ता जाधव, माजी सरपंच शामसुंदर मुळे, बाळराजे जाधव, भगवान खंडागळे, कृष्णा मिसाळ,आदींच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या जनक,पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून गुरु आणि शिष्य यांचा अतूट नातेसंबंध असणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा, गुरु पूर्णिमेस व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण धार्मिक मान्यतेनुसार महर्षि व्यास यांचा जन्म झाला होता. रामायण महाभारत काळात *गुरु आणि शिष्य* ही परंपरा चालत आलेली आहे, तसेच *धर्मशास्त्र, नीतिशास्त्र,व्यवहार शास्त्र, मानसशास्त्र* आदी पुराण ग्रंथात *गुरु आणि शिष्य* यांचा अतुट नातेसंबंध असलेला उल्लेख आढळून येतो. गुरु पौर्णिमेचे महत्व,ज्या व्यक्तीकडून आपण विद्या प्राप्त करतो, मिळवितो त्याच विद्येच्या बळावर आपण उद्धार करीत असतो, आई वडील व गुरुचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, याविषयी सविस्तर माहिती उपक्रमशील, तंत्रस्नेही,शिक्षक दत्तात्रय शिंदे सर,मुख्याध्यापक महावीर शेलार,नरेंद्र रत्नपारखे योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी, चक्रपाणी मुळे,प्रदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती समजावून सांगितली.यावेळी शा.व्य. समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सन्माननीय सदस्य, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशाताई,गावकरी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थीनी श्रध्दा भगवान खंडागळे हिने केले.

Post a Comment
0 Comments