Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काळविट प्राण्याचे दोन शिंगे केली जप्त





अंबड/प्रतिनिधी- आकाश जळके 

अंबड पोलीसांनी काळविट प्राण्याचे दोन शिंगे एकुण किंमती 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही आज दि.11 जुलै 2025 रोजी 15.00 वाजेच्या सुमारास करण्यात आलेली आहे.


याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना त्यांच्या गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका संशईत इसमाच्या घरात काळविट प्राझ्याचे शिंग आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन सदरची पंच व वन विभागाचे आर.एफ.ओ. श्री.दौंड, वनपाल बी.एम.पाटील, कपील शिंगणे, सुप्रिया फड वनरक्षक यांना देऊन दोन पंच व वन विभागचे वर नमुद अधिकारी कर्मचारी तसेच पो.उप.नि.आर.ई. काकड, पो.अं. राऊत, पो. अंमलदार देशमाने तसेच पोहेकॉ चव्हाण, महिला पोहेकॉ अलका केंद्रे, पो. अंमलदार क्षिरसागर असे पो.स्टे.च्या शासकिय वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी इसम नामे दादासाहेब रावसाहेब दिवटे रा. अंबड ता.अंबड जि. जालना याचे अंबड मधील म्हाडा कॉलनीतील राहते घरी जाऊन त्यांच्या घराची घरझडती पंचासमक्ष घेतली असता सदर इमसाच्या घरामध्ये काळविट प्राण्याचे दोन शिंगे किंमती 50,000/- रुपयांचे मिळुन आले. त्यानंतर म्ािळुन आलेले दोन शिंगएका कापडी पिशवीमध्ये टाकुन जप्त करण्यात आले आहे.


सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पो.उप.नि.आर.ई. काकड, पो.अं. राऊत, पो.अं. 1660 देशमाने तसेच पोहेकॉ/1272 चव्हाण, मपोहेकॉ/1173 अलका केंद्रे, पो.अं./221 क्षिरसागर तसेच वनविभागाचे आर.एफ.ओ.श्री.दौंड, वनपाल बी.एम.पाटील, कपील शिंगणे, सुप्रिया फड वनरक्षक आदींनी बजावली.

Post a Comment

0 Comments