अंबड. प्रतिनिधी. दि (18/7/2025) कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल तसेच विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद साधून शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी भव्य स्वरूपात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पालक मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून स्थानिक व्यवस्थापन समिती कार्यवाह मा. श्री.केदारजी मंत्री, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले विद्यालयाचे पर्यवेक्षक मा.श्री श्रीरंग गोसावी, शालेय समिती अध्यक्ष मा.श्री.श्रीपाद जपे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रदीप जोशी उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून पालक मेळाव्यास सुरुवात करण्यात आली.
पालक मेळाव्याच्या प्रास्ताविकेमध्ये विद्यालयाचे मुख्यध्यापक प्रदीप जोशी यांनी शाळेची गुणवैशिष्ट्ये सांगत विद्यार्थ्यांना दिलेल्या नियोजन पुस्तके विषयी सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी महिला पालक संघाच्या श्रीम.गौरीताई जाजू, पालक नीताताई टिंगळे, श्री समाधान मुळे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यालयात मिळत असलेले उत्कृष्ट शिक्षण, व शिस्तबद्धता तसेच विद्यार्थी दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयातील दिले जाणारे दर्जेदार शिक्षण याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्रीपाद जपे यांनी शाळेतील सण व शिक्षण यांची सांगड घालत विद्यालयाची वैशिष्ट्ये पालकांना सांगितले.
लवकरच कै.दत्ताजी भाले विद्यालय पालकांना नवीन स्वरूपात दिसणार आहे. अशी माहिती दिली.
यावेळी पालक मेळ्याव्याचे प्रमुख मार्गदर्शक श्रीरंग गोसावी म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने विविध क्षेत्रात उत्कृष्ट असावे. आजचा विद्यार्थी हा जीव घेण्यास स्पर्धेतून यशस्वी झाला पाहिजे. दत्ताजी भाले विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, व शिस्तीसाठी ओळखले जाते. भारतीय सण व दिले जाणारे संस्कार यामध्ये दत्ताजी भाले विद्यालयाची ओळख आहे. विद्यार्थ्यांना टीव्ही मोबाईल पासून दूर ठेवा. नुसते शिक्षण महत्त्वाचे नाही तर कृती महत्त्वाची असते पालक मेळाव्यातील पालकांचे उपस्थित राहिल्याबद्दल कौतुक केले.
अध्यक्षीय समारोप मध्ये केदारजी मंत्री यांनी विद्यालयाची माहिती सांगत पालकांनी विद्यार्थ्यांना असलेल्या अडचणी सांगाव्यात. सर्व पालक कै.दत्ताजी भाले विद्यालयास सहकार्य करतात याबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी पद्य गायन विद्यार्थी कु तन्वी जाधव,शिवानी जयमा सूत्रसंचालन मेघा वायकोस व आभार प्रदर्शन श्री.मारुती झाटे यांनी केले.
पालक मेळाव्याची सांगता कल्याणमंत्र्यांनी करण्यात आली.

Post a Comment
0 Comments