Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अवैद्य वाळु वहातुक करणाऱ्या चोरावर गोंदी पोलीसांची कार्यावाही

 


आज दिनांक19/07/2025 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वडीगोद्री कडुन गहीनीनाथनगर रोडने एक इसम त्याचे ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये वाळु भरुन येत आहे अशी माहीती गोंदी पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी सपोनि श्री खांडेकर साहेब यांना मिळाली त्यावरुन श्री खांडेकर साहेब यांचे अदेशाने पो. हवलदार-हजारे, पो हवलदार केंद्रे पोकाँ प्रदीप हवाले पोकाँ शेख अशांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता दि, 19/07/2025 रोजी रात्री 00.30 वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर वडीगोद्री कडुन NH 52 च्या सर्वीस रोडने येत असल्याचे दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची पाहाणी केली असता इसम नामे संदीप ममताजी लोखंडे वय 27 वर्षे रा मारोतीनगर अंतरवाली सराठी ता अंबड यांने त्याचे तब्यातिल स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र Mh 21 CA 4597 च्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळु मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन 6,55,000 रुपयाचा ऐवज जप्त करणायात आला असुन फिर्यादी पो. अमलदार प्रदीप हावळे यांचे फिर्यादीवरुन संदीप ममताजी लोखंडे वय 27 वर्षे रा मारोतीनगर अंतरवाली सराठी ता अंबड याचे विरुध्द गुन्हा दाखल करुन यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अयुष नेपणी साहेब, मा उपविभागीय पोलीस अधीकारी अंबड, श्री विशाल खांबे साहेब यांचे मार्गदर्शना खाली सपोनि श्री अशीष खांडेकर, पो.हवलदार हजारे, पो हवलदार केंद्रे पोकाँ प्रदीप हवाले पोकाँ शेख सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास केंद्रे करीत आहे.



Post a Comment

0 Comments