Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएल च्या नेटवर्क गायब ग्राहक त्रस्त 


.


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड प्रतिनिधी :- शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे ४० टॉवर आहे.परंतु सुरळीत मोबाईल सेवा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांनी बीएसएनएलवर विश्वास दाखवला परंतु शहरासह ग्रामीण भागात ३६ तासांपासून बीएसएनएलची बत्ती गुल झाली नेटवर्क गायब असल्याने लोकांचा डाटा खराब झाला असून ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलची मोठ्या प्रमाणात नेटवर्क सेवा विस्कळित होत असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बीएसएनएल टॉवरची रेंज पूर्णपणे गायब झाली.असून, यामुळे कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे अशक्य झाले आहे.
या समस्येमुळे ग्रामीण भागातील ग्राहक विशेषतः त्रस्त आहेत, कारण त्यांच्यासाठी बीएसएनएल हा अनेकदा एकमेव उपलब्ध पर्याय असतो. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणापासून ते व्यावसायिकांच्या दैनंदिन कामांपर्यंत, सर्वच गोष्टींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे.तांत्रिक बिघाड की देखभालीचा अभाव ? याबाबत बीएसएनएलकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या सततच्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लवकरात लवकर यावर उपाययोजना करून अखंडित सेवा पूर्ववत करावी, अशी अंबड शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकाकडून मागणी केली जात आहे

Post a Comment

0 Comments