Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सुखापुरी फाटा येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

 


प्रतिनिधी आकाश जळके 

माजी आमदार श्री बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सुखापुरी फाटा येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले.सुखापुरी परिसरातील सर्व शेतकरी बांधव, महिला भगिनी, विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन तहसील कार्यालयच्या वतीने मुख्यमंत्री याना निवेदन दिले.

निवेदनामध्ये पुढीलप्रमाणे मागणी करण्यात आली आहे 

1 राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे 

2 स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे 

3 अपंगांना वाढीव मानधन देणे 

4 निराधार विधवा महिलांच्या अनुदानात वाढ करणे 

5 जालना जिल्ह्यातील 2023-24 मध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानातील 50000 च्या वरती राहिलेल्या अनुदान अद्यापही जमा झाले नाही ते जमा करणे बाबत.

असा अनेक गरजू मागण्या निवेदन मध्ये मांडण्यात आल्या. यावेळी चक्काजाम आंदोलनामध्ये भरपूर प्रमाणात शेतकरी वर्ग महिला उपस्थित होते या आंदोलनाचे नेतृत्व श्री प्रकाश बोरडे (माजी कृषी उत्पन्न बाजार समती सभापती अंबड)यांनी केले.

Post a Comment

0 Comments