Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कनिष्ठ अभियंताची रस्त्यात गाडी आडवून केस वापस घे नाही तर तंगडे तोडून जीवे मारण्याची धमकी.गुन्हा दाखल



जालना प्रतिनिधी :- तालुक्यातील रामनगर येथील महावितरण च्या कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल शेणकूडे हे गाडीवर जात असताना रस्त्यात गाडीच्या समोर गाडी आडवी लावून शिवीगाळ करत तंगडे तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दि.२ बुधवार रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली याबाबत कनिष्ठ अभियंता महावितरण संदीप विठ्ठल शेणकूडे रा.इंदेवाडी ता.जि.जालना यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत माहिती अशी की कनिष्ठ अभियंता महावितरण संदीप विठ्ठल शेणकूडे हे रामनगर येथून कार्यालयीन कामानिमित्त मंडळ कार्यालय कन्हैया नगर जालनाकडे येत असताना रमेश यज्ञेकर याने सिंधीकाळेगांव जवळ गाडी समोर गाडी आडवी लावून म्हणाला आमच्या हॉटेलवर चहा घेण्यासाठी चला मला तुला थोडे बोलायचे आहे परंतु मला मंडळ कार्यालयाच्या साहेबांनी मिटींग कामी तात्काळ येण्यास फोन केला असल्याने मी त्याला तसे सांगितले व त्याचा सोबत न जाता मी जालन्याचे निघालो असता त्यांनी पाठला करुन छत्रपती पंपाजवळ गाडी समोर गाडी आडवी लावून अरेरावी च्या भाषेत तू जास्त मस्तीला आला का शिवीगाळ केली तू यापूर्वी मौजपूरी पोलीस ठाण्यात जाऊन माझ्यावर केस केली आता तुला इथेच मारतो तुझे तंगडे तोडतो बघू आता कोण साक्षीदार येतो बघतो मी कर्मचारी ला फोन करुन बोलाऊन घेतले कर्मचाऱ्यां समोर रमेश यज्ञेकर याने शिवीगाळ करत याला समजावून सांगा विकास शिंदे यांनी केलेली केस माघारी घेयाला सांगा नाही तर याचे तंगडे तोडून या दोघांनाही संपवून टाकीन असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल शेणकूडे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात कलम १२६(२),३५२,३५१(२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments