अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
: अकोल्याहून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाणारी भरधाव कार वळण रस्त्यावरील खड्ड्यात आदळून भीषण अपघात झाला. ही घटना वडीगोद्री-जालना मार्गावरील मठतांडा शिवारात शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. अकोला येथील शिवाजी पवार हे पत्नी आणि आईसह कारमधून (क्र. एम.एच.३० - बी.एल. ६०६६) पंढरपूरकडे जात होते. त्यांची कार शुक्रवारी सकाळी वडीगोद्री जालना मार्गावरील मठतांडा वळण रस्त्यावर खड्ड्यात आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ती कार रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे तोडून थेट खड्यात जाऊन आदळली. अपघातानंतर कारच्या एअर बॅग उघडल्याने कारमधील कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, जालना ते वडीगोद्री महामार्गावर गती काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे. रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्यासह वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments