Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयात नेतृत्वगुण विकास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणांची पेरणी...


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

आंबेजोगाई  भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालय, अंबेजोगाई येथे दिनांक 30 जुलै 2025 रोजी नेतृत्वगुण विकास शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. पाच सत्रांमध्ये विभागलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना आत्मभान, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वक्षमतेचे बाळकडू मिळाले.


शुभारंभ दिमाखदार वातावरणात

शिबिराचे उद्घाटन शालेय समिती सदस्य श्री तुकारामजी तौर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी प्रा. नाना गोडबोले (अभाविप), मुख्याध्यापक सुधाकर घायतडक, निरीक्षिका श्रीमती एम. जे. तवले, श्रीमती निशा जोशी यांची उपस्थिती लाभली.

 सत्र 1 – आदर्श नेतृत्वावर मार्गदर्शन

प्रा. नाना गोडबोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते दिव्या देशमुखपर्यंतच्या नेतृत्ववृत्तीचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांनी शिस्त, नियोजन, आणि सकारात्मक विचारांची कास धरावी असे सांगितले.

 सत्र 2 – संघ कार्याची ओळख

डॉ. राजेंद्र भाला यांनी विद्यार्थ्यांना संघ जीवनातील सुसंस्कारीत व व्यावसायिक दृष्टिकोन दिला. शाखा म्हणजे चरित्र घडवण्याचे शाळेचे बाह्य रूप असे ते म्हणाले.

 सत्र 3 – आत्मीयतेने भोजन

दहावीतील अभिरूप सामग व आलेख जगधने यांनी भोजन मंत्र म्हणत उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी एकत्रित भोजनाने सौहार्द दृढ झाले.

सत्र 4 – कृती सत्रात सर्जनशीलता फुलली

इ. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य पाहून निरीक्षिका तवले मॅडम भारावल्या. “नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारून इतरांना प्रेरणा देणे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

 सत्र 5 – पोलीस हेडकॉन्स्टेबल मुळक यांची मनमोकळी

मुलाखत इ. 9वीच्या भूमी जामोदेकर हिने घेतलेल्या मुलाखतीत श्री. रामेश्वर मुळक यांनी पोलीस खात्याचे खरे चित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले. श्रीपाद जपे यांनी “नेतृत्व संकटात घडते” या मंत्राने विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

 सूत्रसंचालन – काव्या वाघुंडे व पलक खरात

 पद्यगायन – प्रीती सोळुंके, श्रावणी कचरे, भूमी जामोदेकर

 आभार – लक्ष्मीकांत सामग

 रेखा देशमुख यांच्या ‘पसायदान’ ने

 कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments