Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त “अंबड वार्ता”चे संपादक व उपसंपादक यांनी केले विनम्र अभिवादन

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड प्रतिनिधी – साहित्य, श्रमिक चळवळ, आणि सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त अंबड तहसील कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात “अंबड वार्ता” चे संपादक बळीराम राऊत आणि उपसंपादक आकाश जळके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर साठे यांच्या क्रांतिकारी लेखन, प्रबोधनपर कथा, आणि कष्टकरी समाजासाठी त्यांनी लढलेली लढाई यावर प्रकाश टाकण्यात आला.

तहसील कार्यालयात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व नागरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments