तीन ठाण्यांसह वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बदलले, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नवीन नियुक्ती
जालना प्रतिनिधी | आकाश जळके
जालना जिल्ह्यातील पोलिस दलात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले असून, तीन प्रमुख पोलीस ठाण्यांसह जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाने हे बदल आज (31 जुलै) अंमलात आणले गेले. एकूण 8 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
🔸 तीर्थपुरी पोलीस ठाणे:
सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून बदली,
तर त्यांच्या जागी वैशाली पवार यांची बदली जाफराबाद पोलीस ठाण्यातून करण्यात आली आहे.
🔸 मौजपुरी पोलीस ठाणे:
सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली.
त्यांच्या जागी अतुल पाटील (तालुका पो. ठा. जालना) यांची नियुक्ती.
🔸 टेंभुर्णी पोलीस ठाणे:
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली असून,
कैलास भारती (मंठा पो. ठा.) यांची टेंभुर्णी ठाण्यात नियुक्ती.
🔸 मंठा पोलीस ठाणे:
आर्थिक गुन्हे शाखेतील निलेश इधाटे यांची येथे बदली.
🔸 जिल्हा वाहतूक शाखा:
पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक चंद्रकांत चातुरे यांची वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती.
🔹 बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक गतिशील होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर काही बदलांमुळे स्थानिक ठिकाणी प्रशासनिक रणनीतीतही बदल होण्याची शक्यता आहे.
हे बदल जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाने तात्काळ प्रभावात आले आहेत.

Post a Comment
0 Comments