Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात नागपंचमी सण उत्साहात साजरा




 अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड प्रतिनिधी दि. (29/7/2025)नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी नागाची पूजा केली जाते. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी हा सण साजरा केला जातो.

 कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयांमध्ये नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांनी हाताने तयार केलेले कागदी, कापडी व मातीच्या सापाचे प्रदर्शन व पूजन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी, विभाग प्रमुख श्रीम.रागिणीताई जोशी व मारोती झाटे सर व्यासपीठावर उपस्थित होते.

 मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सापाचे पूजन यावेळी करण्यात आले.

 पूजनानंतर विद्यार्थ्यांनी मनसोक्त असे भारतीय परंपरेतील नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला.

 नागपंचमी सणाच्या औचित्यने विद्यालयांमध्ये झोका बांधण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी झोका खेळून मनसोक्त आनंद घेतला.

 या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सापाचे धार्मिक महत्त्व देत कृष्ण व कालिया मर्दान कथा व साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

 यावेळी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी सूत्रसंचालन अनिल चव्हाण तर आभार प्रदर्शन सुनील कुंभार यांनी केले.

 कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments