Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड चिल्ड्रन इस्लामीक ऑर्गनायझेशन च्या वतीने वृक्षारोपण संबंधित जनजागृती रॅलीचे आयोजन..

 


अंबड वार्ता-प्रतिनिधी/आकाश जळके

अंबड प्रतिनिधी :- चिल्ड्रन इस्लामीक ऑर्गनायझेशन ( CIO ) ने संपूर्ण देशभरात *" मिट्टी में हाथ - दिल वतन के साथ "* हे वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक अभियान सुरू केले आहे. 

दि.२५ जून ते २६ जुलै दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचा उद्देश हा आहे. की या कालावधीत संघटनेच्या वतीने देशभरात एक दशलक्ष झाडे लावली जातील व त्यांचे जतन करून देखभाल राखली जाईल. 

यासंबंधी आज दि. २६ जूलै रोजी येथील अकबरी मस्जिद मधून एका जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी येथील अकबरी मस्जिद मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना संघटनेच्या सदस्यांनी उत्तरे दिली.CIO हे एक असे वैचारिक व्यासपीठ आहे की जे इस्लामीक मूल्यांवर आधारित दृष्टीकोनातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. CIO ची अशी धारणा आहे की निसर्गाची काळजी घेण्याचे धडे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. आणि त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर हीच लहान आणि गोजिरी मुलं समाजात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. 

CIO चे हे अभियान लहान मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारीची जाणीव, आणि सेवाभाव निर्माण करील. तसेच वृक्षारोपणामूळे एक आनंददायी वातावरणाची निर्मिती होऊन देश सेवेच्या कार्यास हातभार लागेल. 

CIO च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अभियानाचा उद्देश स्पष्ट आहे की पृथ्वीवरील उष्णतेत वाढ होत आहे. पृथ्वी अधिकच तापत आहे. दिवसेंदिवस जंगलांची परिणामी झाडांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होऊन वातावरणाची गुणवत्ता खालावत चालली. याचे दुष्परिणाम मनुष्य जीवनावरही दिसून येत आहे. 

CIO चा विश्वास आहे की अशा या भयानक परिस्थिती लहान मुलं महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात. जेव्हा एखादे लहान मुल झाड लावते आणि त्याची काळजी घेते तेव्हा ते केवळ पृथ्वी साठीच नव्हे तर त्याच्या आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी देखील एक महत्वपूर्ण पाऊल ठरते.या उपक्रमांतर्गत लहान मुले आपल्या घरासमोर, परिसरात, खेळांच्या मैदानात, शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात, तसेच आपल्या वस्त्यांमध्ये आणि कॉलोनी मध्ये झाडे लावतील. त्याला आपल्या आवडीनुसार नावे देतील. त्यांची निगा राखतील. या उपक्रमांतर्गत चित्रकला, हस्तकला आणि कथा कवितांमधून आपले अनुभव रेखाटणे. पर्यावरण संवर्धनासाठी हरित प्रतिज्ञा घेणे, शुक्रवारी मशिदीमधून पर्यावरण संवर्धनावर प्रवचन देणे, निसर्गाच्या रम्य वातावरणात अभ्यास दौरे करणे, चित्रकला, कविता आणि कथाकथनाच्या स्पर्धा घेणे ,वृक्षारोपण संवर्धनाचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ आणि रिल्स तयार करून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.या निमित्ताने CIO च्या वतीने विद्यार्थी, शिक्षक,पालक तसेच शाळा व्यवस्थापन व समाजातील धर्मगुरूंना आवाहन करण्यात आले की त्यांनी या ऐतिहासिक आणि अभुतपुर्व अभियानात मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच पर्यावरण संस्था व समाजातील नागरिकांनी या अभियानास प्रोत्साहन देऊन त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन ही करण्यात आले.यावेळी जमाते इस्लामी हिंद अंबड शाखेचे अध्यक्ष मौलाना सादेक मजाहीरी, महिला शाखेच्या अध्यक्ष खिजर जमानी, गर्ल्स इस्लामीक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या अंबड शाखेच्या अध्यक्ष सारा फिरदौस सोबतच इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments