अंबड वार्ता-प्रतिनिधी/आकाश जळके
अंबड प्रतिनिधी :- महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड मध्ये कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून प्राचार्य राजेश धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी गट निदेशक आर.जी. डोईजड तर प्रमुख वक्ते म्हणून संतोष दह्याळकर, माजी सैनिक एन. बी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमास माजी सैनिक एन. बी. चौधरी यांनी युद्धाविषयी थरारक अनुभव आणि सीमा रेषेवरील सैन्याच जीवन प्रवासावर प्रकाश टाकला त्यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
संतोष दह्याळकर यांनी मार्गदर्शन करतेवेळी कारगील युद्धाची पार्श्वभूमी, युद्धनीती यावर मत मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बनसोडे आणि आभार जे. बी. साळुंके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एल.व्ही. पुपले, आर.एन. सावंत, दत्ता चौधरी, योगेश आठवले, एस.एम. मतकर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments