Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरतखेडा या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान 13 ,14 आणि 15 ऑगस्ट या रोजी राबविण्यात आले

 


*प्रतिनिधी / पारनेर गणेश पाटील शेरे* 

 त्यानिमित्ताने अंबड तालुक्यातील हरतखेडा प्राथमिक शाळेतील मुलांनी गुरुवारी विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढली व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. हर घर तिरंगा अभियान रॅलीत महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.संगीत कवायत, लेझीम नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत घेण्यात आले. मुलांची भाषणे झाली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप पाटील वाकणकर तसेच उपाध्यक्ष रमजानी बागवान व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. गावचे प्रथम नागरिक सरपंच रंजीत येडे, उपसरपंच राजू बागवान व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप अवधूत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी त्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रम ची माहिती सांगितली.

  देशभक्तीपर गीता वर कवायत हा नावीन्यपूर्ण उपक्रमाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवले. 

या मध्ये अबूसईद हारून शहा या विद्यार्थ्याचे भाषणातून प्रत्येक उपस्थित नायिकांच्या अंगावर रोमांच उभा राहिले. 

  कार्यक्रम साठी गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री दिलीप अवधूत यांच्यासह गणेश कुटे, उदय कुमार भाले, कदीर खान पठाण, रविन्द्र टाकसाळ हरिभाऊ गायकी, दत्तात्रय जाधव,श्रीमती कल्पना बांडगे व श्रीमती विद्या देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments