Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्रात 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिन म्हणून साजरा होणार; शासनाच्या घोषणेचे स्वागत






राष्ट्रीय विमुक्त घुमंतू महासंघाच्या पाठपुराव्याला यश; प्रोफेसर डॉ. अंकुश चव्हाण यांनी मानले शासनाचे आभार.                     

अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके


अंबड : महाराष्ट्र सरकारने 31 ऑगस्ट हा दिवस राज्यात भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्र उभारणीत भटके विमुक्त समाजाचे योगदान मोठे होते त्यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला असून समाजातून या निर्णयाचे स्वागत होत आहे राष्ट्रीय विमुक्त घुमंतू जनजाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष (युवा मोर्चा)प्रोफेसर डॉ. अंकुश चव्हाण यांनी या घोषणेबद्दल शासनाचे आभार मानले आहेत भाजप आमदार प्रवीण दटके राष्ट्रीय घुमंतू जनजाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष (युवा मोर्चा) प्रोफेसर डॉ. अंकुश चव्हाण राष्ट्रीय नेते लक्ष्मण जी गायकवाड नारायण जी चव्हाण यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा दिवस साजरा करण्याची मागणी शासनाकडे अनेक वेळा केली होती त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून सरकारने याबाबत जीआर जारी केला आहे. इंग्रजांनी 1871साली देशातील 193 जातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारून निर्बंध लादले होते. आता या समाजाच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे इतर मागास कल्याण विभागाचे मंत्री अतुल जी सावे आणि भटके विमुक्त जातीच्या सर्व संघटनांच्या सहकार्याने हा दिवस साजरा केला जाईल असे डॉ.अंकुश चव्हाण यांनी सांगितले या निर्णयामुळे समाजाला नवी ओळख आणि सन्मान मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments