अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत जालना लोकसभा मतदारसंघात २० नवीन आरोग्य सुविधा केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये १८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आणि २ तालुका आरोग्य कार्यालयांचा समावेश आहे. या केंद्रांसाठी एकूण ₹११६६.३८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच वैद्यकीय सेवा मिळणार असून, मातांसाठी प्रसूती सेवा, लसीकरण, बालसंगोपन व इतर प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.
खासदार डॉ. काळे यांनी आरोग्य सेवेची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवले होते आणि त्या मागणीला यश मिळाले आहे.
या केंद्रामुळे अंबड, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, जाफ्राबाद, पैठण आदी तालुक्यांतील निवडलेल्या गावांमध्ये नवीन आरोग्य सुविधा सुरू होतील.
खासदार डॉ. काळे म्हणाले, "प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हे माझं ध्येय आहे आणि त्यासाठी मी सातत्याने काम करत आहे."
ही योजना म्हणजे मतदारसंघाच्या आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments