Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड तालुक्यात महसूल सप्ताह उत्साहात साजरा – जामखेड येथे विविध योजनांचे थेट लाभ वाटप; आमदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड (प्रतिनिधी) | दि. ०४ ऑगस्ट २०२५ :

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार साजऱ्या होणाऱ्या 'महसूल सप्ताहा' अंतर्गत अंबड तालुक्यातील जामखेड येथे एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला आमदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध शासकीय योजनांचे थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण होते. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी नागरिकांना योजनांबद्दल सविस्तर माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदार नारायण कुचे यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचे आणि सर्व विभागांमधील समन्वयाचे कौतुक करत "या उपक्रमामुळे शासनाचे खरे रूप जनतेसमोर येते," असे मत व्यक्त केले.


वाटप केलेल्या योजना आणि लाभार्थी संख्या (जामखेड मंडळात):

महसूल विभाग

गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान आदेश – 07

ई-रेशनकार्ड – 45

जात प्रमाणपत्र – 55

नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र – 48

उत्पन्न प्रमाणपत्र – 102

निवासी (डोमिसाईल) प्रमाणपत्र – 84

कृषी विभाग

ट्रॅक्टर वितरण – 01

फळबाग पुनरुज्जीवन पत्र – 27

महाडीबीटी अंतर्गत शेततळे, मळणी यंत्र, रोटाव्हेटर – 15

पंचायत समिती विभाग

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) – 400 घरकुल मंजुरी

घरावरील सोलर पॅनल – 380

आयुष्मान भारत कार्ड वाटप – 360

महिला

 व बालकल्याण विभाग

बेबी केअर किट वाटप –



Post a Comment

0 Comments