Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घुंगर्डे हादगाव येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

 



घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी): अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील दुर्गा माता मंदिरात नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव- नामदेवांच्या परिवारातीलच एक मानले जाते. मध्य प्रदेशातील बांधवगड मध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजा रमलेले असायचे. असा या थोर संताची पुण्यतिथी घुंगर्डे हादगाव येथील नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने तसेच महिलाही उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments