Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जायकवाडी धरणातून विसर्ग वाढ, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

 (प्रतिनिधी) :जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. आज दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 ते 8.45 या वेळेत गेट क्र. 10 ते 27 असे एकूण 18 गेट्स 2.5 फुटांवरून 3.0 फुट उंचीपर्यंत उघडण्यात येणार आहेत.

या माध्यमातून 9,432 क्युसेकने विसर्ग वाढवून सध्या नदीपात्रात सुरू असलेला 47,160 क्युसेक विसर्ग मिळून एकूण 56,592 क्युसेक पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आवक पाहून पुढील विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

— आदेशानुसार, कार्यकारी दंडाधिकारी अंबड


Post a Comment

0 Comments