अंबड (प्रतिनिधी) : आकाश जळके
अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून या नियुक्तीने जिल्हा राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. विकासाच्या कामांमध्ये सातत्याने वेगळेपण जपणाऱ्या नानांच्या नेतृत्वगुणांची दखल घेऊन पक्षाने हा सन्मान बहाल केला आहे.
नाना खडके हे राजकारणात आले त्या दिवसापासून “काम करा, जनतेचा विश्वास जिंका” हा मंत्र जोपासत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेली लढाई, जिल्हा परिषदेच्या कामकाजात दाखवलेली तत्परता आणि अंबड तालुक्यातील रस्ते, पाणी, शिक्षण व सामाजिक सोयींवर केलेला ठोस विकास हा त्यांच्या कार्यकाळाचा ठसा आहे.
त्यांच्या या कार्यकौशल्यामुळेच जनतेच्या कामांना अडथळा आणून राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली आहे. कारण जनतेच्या पाठिंब्यावर उभा असलेला नेता कधीच एकटा नसतो, हे नानांनी दाखवून दिले आहे.
भाजपने केलेली ही नियुक्ती ही केवळ नानांचा सन्मान नसून, अंबड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचाही सन्मान आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जिल्हाभरातून "अभिनंदन नाना"च्या घोषणांनी वातावरण गाजत आहे.

Post a Comment
0 Comments