अंबड (प्रतिनिधी) : आकाश जळके
अंबड तालुक्यातील अनेक शासकीय योजनांचे लाभधारक अजूनही ई-केवायसी न केल्यामुळे त्यांचे अनुदान रोखले गेले आहे. शासन नियमांनुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
प्रलंबित यादीत मोठ्या संख्येने लाभधारकांचा समावेश असून ई-केवायसीच्या विलंबामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळत नाही. वेळेत प्रक्रिया न झाल्यास शेतकरी व इतर लाभार्थ्यांना आर्थिक फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांतून जनजागृती होऊन प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत संदेश पोहोचावा, यासाठी प्रशासनाने पत्रकार बांधवांना पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.

Post a Comment
0 Comments