घनसावंगी, प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील एकरूखा येथे अण्णासाहेब कारभारी सानप वय ७० वर्ष हे शेतकरी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातून घरी परततांना बहिरी नदीत प्रचंड पाण्याच्यां प्रवाहात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरुन वाहून गेले.आण्णासाहेब कारभारी सानप हे वाहून गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी तहसीलदार यांना माहिती दिली. घटनास्थळी तहसील,आप्पती व्यवस्थापन टीम तसेच पोलीस प्रशासन दुपार पासून वृद्ध शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापही सानप या शेतकऱ्यांचा शोध लागला नाही. आमदार हिकमत उढाण यांनी जिल्हाधिकारी तसेच घनसावंगी तहसीलदार व NDRF टीमशी सातत्याने संपर्क साधून मदतीबाबत सूचना देत आहेत. गावकरी देखील शोध घेत होते.
पुढील तीन दिवस पाऊसाचा जोर अजून वाढणार आहे तरी सर्व नागरिकांनी आपले घर ,गाव सोडू नाही,जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन आमदार हिकमत उढाण यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments